सभागृहे / संदर्भ ग्रंथालय

सभागृहे / संदर्भ ग्रंथालय

डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृह

  तळमजला आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या या नाट्यगृहात ८१६ प्रेक्षक बसण्याची सोय आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या वातानुकुलीत नाट्यगृहात व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगभूमीची नाटके, नृत्य, लोककलेचे व शालेय कार्यक्रम आणि साहित्य संमेलने नेहमी होत असतात.
     
  या सभागृहाचे आरक्षण श्री. रोहिदास पांगे पाहतात.
दूरध्वनी क्रमांक : (०२२) २३८५ ६३०३
विस्तारित क्रमांक : २७
 

डॉ. भा. नी. पुरंदरे सभागृह

  संघाच्या इमारतीत ५व्या मजल्यावर डॉ. भा. नी. पुरंदरे सभागृह आहे. या सभागृहात १२० प्रेक्षक बसण्याची सोय आहे व हे सभागृह छोटे समारंभ, व्यावसायिक बैठका तसेच गाण्यांच्या बैठकीस उपयुक्त आहे.
     
  या सभागृहाचे आरक्षण चौथ्या मजल्यावरील संघ कार्यालयात होते.
दूरध्वनी क्रमांक : (०२२) २३८५ ६३०३
विस्तारित क्रमांक : २१ / २२
 

गजेंद्रगडकर स्मारक ग्रंथालय

  साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाच्या दि.१७ नोव्हेंबर १९४७ रोजी झालेल्या बैठकीत, साहित्य संघाचे एक संस्थापक प्रा. अ.बा.गजेंद्रगडकर यांच्या नावे, एक संदर्भ ग्रंथालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित झाला व त्याप्रमाणे १९४८ मध्ये ग्रंथालय सुरु झाले.

हे ग्रंथालय सुरु करण्यासाठी श्री. अ.अ.गजेंद्रगडकर यांनी वडिलांचा बराच मोठा ग्रंथ संग्रह संघाच्या स्वाधीन केला. श्री. र.धो.कर्वे यांनीही आपला ग्रंथसंग्रह संघाकडे सुपूर्द केला व त्यात श्री. शि.बा.शिरगावकर, श्री आगासकर व इतर अनेक सभासदांनी व व्यक्तींनी आपल्याकडचे मौल्यवान ग्रंथ पाठवून भर घातली.

या ग्रंथालयात मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेत लिहिलेली सुमारे १४,७०० पुस्तके आहेत व त्यात शब्दकोश, वाङ्मय कोश, कादंबऱ्या, कथा, नाटके व नाटकासंबंधी पुस्तके, आध्यात्मिक ग्रंथ तसेच मासिक व वार्षिक अंक अश्या अनेक विषयावरची पुस्तके आहेत.

प्रबंध लिहिणाऱ्या अनेक व्यक्तींना या संदर्भ ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.

आज हे ग्रंथालय संघाच्या वास्तूच्या ४थ्या मजल्यावर आहे.