गॅलरी
नाट्यसेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ 2026
गेली 91 वर्षे संगीत आणि साहित्याचा वारसा जपणारी संस्था “मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव” यांच्या तर्फे डॉ. अ. ना. भालेराव यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा केला जातो. त्या अंतर्गत या वर्षी बुधवार, २६ ऑगस्ट २०२६, संध्याकाळी ५:०० वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, डॉ. अ.ना. भालेराव सभागृह, गिरगाव,येथे साहित्य संघ, नाट्य शाखे तर्फे ‘नाट्यसेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता, आणि त्यांच्याच हस्ते नाट्यक्षेत्रातील विविध विभागांतील मानकऱ्यांचा ‘नाट्यसेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता . पुरस्कार सोहळ्यानंतर रसिकांसाठी खास काही नाट्यपदे व नाट्यप्रवेश अशा स्वरूपाचा ‘स्मरणगाथा’ हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. चालू किंवा गेल्या वर्षी ज्या रंगभूमीवरील कलाकारांचे, लेखकांचे व संगीतकारांचे जन्मशताब्दी वर्ष होते, त्यांना अभिवादन करून त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींचे सादरीकरण या कार्यक्रमात केले गेले. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य होता.