मुंबई मराठी साहित्य संघ

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी विनाशुल्क प्रशिक्षण वर्गां

महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी विनाशुल्क प्रशिक्षण वर्गांचा शुभारंभ दि. ५ जून २०२६ रोजी मुंबई मराठी साहित्य संघात झाला. एकंदर ७४९ विद्यार्थ्यांनी या वर्गांचा लाभ घेतला. यात सात रस्ता येथे डॉ. रोहिदास दुसार यांनी घेतलेल्या दोन बॅचेस मधील ९५ चालकांचा समावेश आहे. मुंबई मराठी साहित्य संघात श्रीमती मीनाक्षी जयकर यांना संघातील कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. याशिवाय मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने श्रीमती संध्या गोखले यांनी मराठी विद्यालय, घाटकोपर येथे हे प्रशिक्षण वर्ग घेतले. तिथे साधारण १३७१ टॅक्सी-रिक्षा चालकांनी या वर्गांचा लाभ घेतला. प्रा. प्रतिभा सराफ यांनी ‘वडाळा आरटीओ’ ‘चुनाभट्टी’, ‘देवनार’ आणि ‘धारावी’ या चार विभागांची समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. जेथे ५६५३ चालकांनी या अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी केली होती. इथे चार केंद्र संचालक तसेच दहा-बारा शिक्षक ज्ञानदानाचे काम करत होते. या वर्गांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. कार्याध्यक्ष डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली तसेच भाषा प्रकल्प प्रमुख प्रा. सुहासिनी कीर्तीकर आणि प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीरित्या पार पडला. या प्रकल्पाचा समारोप प्रमाणपत्र वितरणाने संपन्न झाला. या संपूर्ण प्रकल्पाच्या अभ्यासक्रम तयार करण्याचे काम ज्यांनी केले त्यात मुंबई मराठी साहित्य संघातर्फे डॉ उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. सुहासिनी कीर्तीकर आणि डाॅ. अनुपमा उजगरे यांचा सहभाग होता.

Scroll to Top