मुंबई मराठी साहित्य संघ

मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन

मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन आणि ‘वाचन प्रेरणा दिन’ शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात साजरा होणार आहे. समारंभाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकर्मी मा. रोहिणी हटंगडी भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त मा. अश्विनी भिडे (भा.प्र.से.) उपस्थित राहणार आहेत. या समारंभास आपण अगत्याने उपस्थित राहावे, ही विनंती.

पारितोषिक वितरण सोहळा
विशेष कार्यक्रम : तेथे कर अपुले जुळती (मुंबई मराठी साहित्य संघाच्या ९० वर्षांतील आजी-माजी अध्यक्षांच्या साहित्य / नाट्य / कवितांचा वेध)

स्थळ : डॉ. अ.ना. भालेराव सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगांव, मुंबई – ४०० ००४. मी.: ७३०४३६९३९६

Scroll to Top